नक्षलग्रस्त भागातील १७व्या लोकसभा निवडणुकीचा प्रत्यक्ष अनुभव
‘न्यूटन’ हा चित्रपट मागे येऊन गेला. या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी मला पटल्या नाहीत. वास्तविकता फार वेगळी आहे. सुरक्षा दलाचे काम अजून प्रभावीपणे त्यात दाखवता आले असते. गेल्या चार वर्षांपासून मी नक्षलग्रस्त अशा दुर्गम भागात कार्यरत आहे. परिस्थिती खूप जवळून बघितली आहे. नक्षल्यांचा प्रभाव क्षेत्रात सुरक्षा बल जोखीम पत्करून जिकिरीने निवडणूक कडेकोट बंदोबस्तात पार पाडतात. अतिशय आव्हानात्मक काम असते.......